Friday, February 14 2025 7:43 pm

“पहिले वर्ष सुराज्याचे” मासिकाचे प्रकाशन

मुंबई, 5 : राज्य शासनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेणारी निर्णय पुस्तिका “पहिले वर्ष सुराज्याचे” आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या लोकराज्य या मासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे प्रकाशन झाले. यावेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते.