Monday, June 17 2019 4:05 am

27 जानेवारीला ठाण्यात रंगणार ठाणे महापौर चषक भजन स्पर्धा

ठाणे-: धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणेमहापालिकेच्या वतीने ’ठाणे महापौर चषक संगीत भजन स्पर्धा 2018-19’ चेआयोजन 27 जानेवारी 2019 रोजी शक्तिस्थळ, आर्य क्रीडा मंडळाचे मैदान,ठाणे येथे करण्यात आले आहे. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्याअध्यक्षतेखाली या स्पर्धा होणार असून विजेत्या मंडळास चषक व रोखपारितोषिके देण्यात येणार आहेत.

     पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य पं. नारायणराव देशपांडे व पं. नारायणबोडस व विदुषी स्व. शोभा गुर्टु यांचे शिष्य यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धांचेसंयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमाकांसाठी रोख रु.20हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 10 हजार व 5 हजार रुपयांची चार उत्तेजनार्थपारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट गायन, तबला वादक,पखवाज वादन, झांज, हार्मोनियम वादक  यांनाही5 हजार रुपयांचे रोखपारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिमतारीख  22 जानेवारी 2019 असून  स्पर्धेचे अर्ज हे दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच ठाणे महानगरपालिकाकार्यक्षेत्रातील भजन मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून एकूण 25मंडळांना सहभागी करुन घेतले जाणार असून याबाबतचा अंतिम निर्णय हाठाणे महापालिकेचा असणार आहे. तसेच पारितोषिक वितरण सोहळा स्पर्धासमाप्त  झाल्यानंतर लगेचच होणार आहे

     स्पर्धेच्या आयोजनाबद्दल व इतर माहितीसाठी गुरूनाथ पाटील यांचेशी9821914604 व संयोजक नंदकुमार पाटील यांचेशी 9322752698 याक्रमाकांवर संपर्क साधावा.