Wednesday, February 26 2020 10:03 am

26 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडीचा नाशिक मध्ये मेळावा

ठाणे :- रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी व्यापक आणि मजबूत करण्यासाठी 26 ऑगस्ट रोजी नाशिक येथे करा साहेब गायकवाड सभागृहात रिपब्लिकन नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित केल्याचे रिपब्लिकन जनशक्तीचे निमंत्रक आमदार प्रा जोगेंद्र कवाडे आणि  नानासाहेब ईंदीसे यांनी जाहीर केले.

रिपब्लिकन पक्षाच्या सर्वच घटक पक्ष नेत्यांना निमंत्रित करून एक बलदेव रिपब्लिकन जनशक्ती निर्माण करण्याचा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.  17 ऑगस्टला हा मेळावा आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले परंतु निर्माण झालेल्या भयानक पूरस्थिती मुळे हा मेळावा 26 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे.पूरग्रस्त सांगली कोल्हापूर येथील रहिवाशांचे पुनर्वसन करून त्यांना तातडीची आर्थिक आणि वैद्यकीय मदत शासनाने पुरवावी.अनेक कुटुंबातील कमावते पुरुष त्याचबरोबर महिला व मुले यांना या महापुरात प्राण गमवावे लागले त्या कुटुंबाकडे शासनाने विशेष लक्ष द्यावे.

नानासाहेब ईंदीसे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज परिवर्तनाचा लढा आयुष्यभर लढले. दलित आदिवासी ओबीसी भटके-विमुक्त या उपक्षित समाजास भारतीय घटनेच्या माध्यमातून नवजीवन प्राप्त करून दिले.या सर्व घटनांना आपले अधिकार अबाधित राखण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजकीय पक्ष दिला. म्हणूनच आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष एकसंघ करण्याकरिताच रिपब्लिकन जनशक्ती महाआघाडी स्थापन केली आहे. रिपब्लिकन शक्ती बलाढ्य आहे. मात्र ती विखुरलेली आहे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाची एकजूट होणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाने सर्व उपेक्षित घटकांना न्याय दिला. आज भारतीय संविधान डोक्यात आहे ते वाचवण्याची जबाबदारी यात समाज घटकांची आहे हे विसरून चालणार नाही. निवडणुका येतील, जातील आमदार, खासदार होण्याची ही लढाई नाही. आमची लढाई अनुसूचित जाती जमाती अल्पसंख्यांक यांचे हक्क आणि अधिकार यासाठी आहे.सर्वच विरोधी पक्ष ईव्हीएम मशीन च्या विरोधात एकवटले आहे आमची ही मागणी आहे की निपक्षपाती निवडणुकांसाठी बॅलेट पेपर वरच विधानसभेची निवडणूक व्हावी.