ठाणे, 11- 25-ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभानिहाय मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी पुरविण्यात येणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्ही. व्ही पॅट मशीनची सरमिसळ (Randomization) आज केंद्रीय निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक जे. श्यामला राव, 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी 25-ठाणे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 25- ठाणे लोकसभा मतदारसंघात 145 मीराभाईंदर, 146 ओवळा माजिवडा, 147 कोपरी पाचपाखाडी, 148 ठाणे, 150 ऐरोली, 151 बेलापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 453 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून या सर्व मतदान केंद्रावर लागणाऱ्या कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व व्ही.व्ही. पॅट मशीनची ऑनलाईन पध्दतीने सरमिसळ (Randomization ) उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीसमक्ष करण्यात आली.
25-ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 2 हजार 453 मतदान केंद्रे असून या केंद्रावर एकूण 4 हजार 906 बॅलेट युनिट (राखीव – 1 हजार 200), कंट्रोल युनिट 2 हजार 453 (राखीव- 1 हजार 20) व्ही. व्ही पॅट 2 हजार 453 (राखीव 1 हजार 191) मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्व मशिन्सच्या नंबरची सरमिसळ आज सर्वसाधारण निरीक्षक जे. श्यामला राव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी सर्व मतदान केंद्रावर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचाही सविस्तर आढावा घेतला.