Monday, September 28 2020 1:25 pm

20 सप्‍टेंबर पोलिओ रविवार नियमित लसीकरणाचालाभ 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा

ठाणे : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ठराविक अंतराने करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचे आयोजन येत्या रविवारी 20 सप्‍टेंबर, 2020 रोजी करण्यात आले आहे. पल्स्‍ पोलिओ रविवार व नियमित लसीकरणे या अंतर्गत या मोहिम राबविण्यात येणार असून सर्व लसी प्रत्येक विभागातील आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध करण्यात आल्या असून त्याचा लाभ पालकांनी 5 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांना द्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व ‍ अति. आयुक्त(१) गणेश देशमुख यांनी केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओचे समुळ उच्चाटन करण्याचे ध्येयनिर्धारीत केले असून, त्या पार्श्वभूमीवर भारतात सातत्याने पल्सपोलि ओविशेषलसीकरण मोहिम राबविण्यात येते. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिम ठाणे महापालिकेने उत्कृष्टपणे राबविली आहे. यामोहिमेससर्वस्तरातीलनागरिकांचाउत्तमप्रतिसादलाभलाआहे.

रविवार दिनांक 20 सप्टेंबर, 2020 रोजी ठाणे महापालिकेच्यावतीने विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमेतंर्गत एकही बालक पोलिओ डोस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. सदर दिवशी महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी बुथवर व त्यानंतर पुढील पाच दिवस प्रत्येक घरोघरी जाऊन लाभार्थींचा शोध घेऊन त्यांना पोलिओ चे डोस देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.