Monday, January 27 2020 1:57 pm

गणेश नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

मुंबई :-  अखेर  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक आणि माजी खासदार संजय नाईक यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामळे नवी मुंबई मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस ला सर्वात मोठा फटका बसला आहे, कारण   गणेश नाईक  आणि माजी खासदार संजय नाईक यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नवी  मुंबईत झालेले भाजपच्या मेगाभरती ३ मध्ये त्यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होते.