Monday, January 27 2020 2:54 pm

इराणला नष्ट करू;डोनाल्ड ट्रम्प यांची चेतावणी

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला नष्ट करण्याची चेतावणी दिली आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील तणाव सध्या वाढतच आहे. जर इराणने अमेरिकेच्या हितावर हल्ला केला. तर त्यांना नष्ट करण्यात येईल, अशी धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. इराणला लढायचे असेल तर इराणचा अंत होईल. अमेरिकेला पुन्हा कधीही धमकी देऊ नये, असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

अमेरिकेने आखाताच्या समुद्रात आपल्या युद्धनौका आणि बी-५२ बॉम्बर विमाने तैनात केली आहेत.दरम्यान, इराणच्या विदेश मंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांनी म्हणाले होते कि, आम्हाला युद्ध नको आहे. ही गोष्ट निश्चित आहे.