Friday, May 24 2019 6:49 am

लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच पंतप्रधान मोदी केदारनाथ चरणी

केदारनाथ (उत्तराखंड):- लोकसभा निवडणूक २०१९ चा प्रचार संपल्यावर पंतप्राढाल नरेंद्र मोदी लगेच केदारनाथ येथे दाखल झाले. केदारनाथ मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी रुद्राभिषेक केला.आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी केदारनाथ येथे दाखल झाले. पंतप्रधानांचा हा दोन दिवसीय दौरा आहे. पांरपरिक गढवाली पोषाख, कमरेला भगवा गमछा आणि पहाडी टोपी घालून पंतप्रधान मोदी केदारनाथ येथे दाखल झाले. केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर यावेळी पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला. महापूरानंतर केदारनाथ येथे सुरू असलेल्या पुर्नविकासाच्या कामाबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. केदारनाथ येथे रात्री मुक्काम केल्यानंतर पंतप्रधान रविवारी सकाळी बद्रीनाथ येथे पोहचणार आहेत. त्यानंतर रविवारीच दिल्लीत परतील.
लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडणार आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघाचा समावेश आहे.