Friday, May 24 2019 6:54 am

तरुणाच्या पोटातून काढले ११६ खिळे

जयपूर : जयपूरच्या बुंदी जिल्ह्यातील एक तरुणाच्या पोटातून एक नाही तर तब्बल ११६ लोखंडी खिळे,तारा आणि काडतूस काढण्यात आहे आहेत.डॉक्टरांनी या रुग्णाच्या पोटातून  यशस्वी ऑपरेशन करून या वस्तू काढल्या आहेत. या वस्तू पोटात गेल्याच कशा? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

भोला शंकर  असं या रुग्णाचं नाव असून अचानक त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला बुंदी जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी त्याचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन काढण्यात आला. तेव्हा त्याच्या पोटात खिळे आणि तारा दिसल्या. डॉक्टरांनी लगेचच त्याच्या कुटुंबीयांना सर्जरी करण्यास सांगितले. दीड तास ऑपरेशन करून डॉक्टरांनी भोलाच्या शरीरातील सर्व लोखंडी वस्तू काढल्या आहेत.भोला २० वर्षांपूर्वी बागकाम करत असे. मात्र त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्याने ते काम सोडून दिले होते, असे भोलाच्या वडिलांनी डॉक्टरांना सांगितले. त्यावरून मानसिक स्थिती बरोबर नसल्याने भोलानेच या लोखंडाच्या गोष्टी खाल्ल्या असतील, असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे. भोलाच्या पोटातील एक खिळा जवळपास ६.५ इंच लांब होता, अशी माहिती डॉ. अनिल सैनी यांनी दिली.