Sunday, September 15 2019 11:37 am

13 सप्टेंबरला भास्कर जाधव करणार शिवसेनेत प्रवेश

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर अखेर शिवसेनेत प्रवेश करणार आहे. १३ सप्टेंबर रोजी जाधव शिवसेनेत प्रवेश करणार असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्याचा निर्णय घेतला.  कोणातीही नाराजी नसल्याचं स्पष्ट करत आपण पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहोत आणि स्वगृही परतत असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व कार्यकर्ते आपल्या सोबतच असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. आपल्यासोबत 9 जिल्हा परिषद सदस्य आणि गुहागर पंचायत समिती आणि 73 सरपंच असल्याचा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे. आपले पुत्र विक्रांत यांना राजयोग असेल तर आमदार होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.