Tuesday, July 23 2019 2:58 am

डायलिसिस विभागात उपचार सुरु असणारऱ्या ६० वर्षीय रुग्णाची खिडकीतून उडी मारून आत्महत्या

नाशिक -: जवाहरलाल गुप्ता यांच्यावर डायलिसिस विभागात उपचार सुरु होते.  नाशिक शहरातील संदर्भ सेवा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जवाहरलाल गुप्ता या 60 वर्षीय रुग्णाने खिडकीतून उडी मारुन आत्महत्या केली आहे. या रुग्णालयात आत्महत्येची महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. तर मागील चार वर्षातील ही चौथी घटना आहे.याआधी आत्महत्या करणाऱ्या रुग्णांवरही याच विभागात उपचार केले जात होते. त्यामुळे रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

पोलीस विभागाकडून रुग्णालय व्यवस्थापणाशी पत्रव्यवहार केला जात असून खिडकीला जाळी बसविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, मात्र रुग्णांच्या आत्महत्याप्रकरणी रुग्णलाय व्यवस्थापनाने आपले हात झटकले आहेत. निधी कुठून आणायचा, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं रुग्णलाय प्रशासनाचं म्हणणं आहे.