Sunday, July 5 2020 9:19 am

1 जुलै रात्री 12 वाजेपासून 11 जुलैपर्यंत ठाणे शहरात कडक लाॅकडॉऊन होणार

ठाणे :  ठाण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केवळ त्या त्या ठिकाणचे हॉटस्पॉट बंद करून जास्त फरक पडणार नाही. त्यामुळेच आता ठाणे महापालिका आणि ठाणे पोलीस यांच्यात झालेल्या संयुक्त बैठकीत संपूर्ण ठाणे शहर हे एक जुलै च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते 11 जुलै मध्ये रात्री बारा वाजेपर्यंत पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील अंतर्गत रस्ते देखील बंद असणार आहेत केवळ हायवे सुरू राहणार असून शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय अत्यावश्यक बाबी म्हणून केवळ मेडिकल डॉक्टरांचे दवाखाने आणि दूध विक्री सुरू राहणार आहे. बाकी किराणामाल किंवा भाजी विक्री देखील या कालावधीत करता येणार नाही. तर या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच कामावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे.