Tuesday, April 23 2019 10:01 pm

५ वर्षाच्या मुलीचे लैंगिक शोषण करुन हत्या

मुंबई -: माहीमच्या एल.जे रोडवरील झोपडीतून पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. ती मुलगी आपल्या परिवारासोबत त्या झोपडीत राहत होती. 3 अज्ञात इसमांनी तिला झोपडीतून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला होता. आता माहीममध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला आहे. मुलीचे लैंगिक शोषण करुन हत्या करण्यात आली आहे.

तिचे आई-बाब मोल-मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. मुलीच्या वडीलांना सकाळी उठल्यावर ती दिसली नाही. त्यांनी आजुबाजूला चौकशी केली. त्यानंतर घाबरलेल्या वडीलांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. 10 वाजण्याच्या सुमारास त्याच रोडवरील एका सामसूम जागी मुलीचा मृतदेह सापडला. याठिकाणी दारुडे, गर्दुल्यांचा येजा सुरु असते.  पोस्टमार्टन रिपोर्टमध्ये मुलीवर बलात्कार झालेल्या घटनेस दुजोरा देण्यात आला आहे.