Monday, January 27 2020 2:17 pm

५० मीटर फ्री स्टाईल मध्ये सानिका वैद्य पहिला क्रमांक

ठाणे : ठाण्याची सानिका वैद्य ह्या ऑटिस्टिक असलेल्या मुलीने १३ वी महाराष्ट्र राज्य पॅरालीम्पिक स्विमिंग चॅम्पिअनशिप २०१९ या स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल मध्ये पहिला क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळविले व ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये दुसरा क्रमांकावर येऊन सिल्वर मेडल मिळविले आहे. गोदिंया येथे आयोजन करण्यात आलेल्या १३ वी महाराष्ट्र राज्य पॅरालीम्पिक स्विमिंग चॅम्पिअनशिप २०१९ मध्ये ऑटिस्टिक (स्वमग्न), डाउन सिन्ड्रोम व मतिमंद असलेल्या खेळाडूंना भाग घेण्याची संधी देण्यात आली.या स्पर्धेत ठाण्याची सानिका वैद्य हिने सहभाग घेतला होता. S – १४ जुनिअर मुलींच्या ग्रुप मध्ये भाग घेतला होता. तिने ५० मीटर फ्री स्टाईल मध्ये पहिला क्रमांक पटकावून गोल्ड मेडल मिळविले व ५० मीटर बॅकस्ट्रोक मध्ये दुसरा क्रमांकावर येऊन सिल्वर मेडल मिळविले आहे.तिचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.