Monday, June 1 2020 2:37 pm

२.२६ कोटीचा कांदा व्यापाराला गंडा घालणाऱ्या दुकलीला जामीन मंजूर अटकपूर्व जामीन देण्यास नकार २२ मे रोजी पुन्हा सुनावणी

ठाणे : स्वस्त दारात कांदा खरेदी करीत भाव वाढल्यानंतर कांदा विकून जास्त नफा कमविण्याच्या लालसेपोटी तब्बल २ कोटी २६ लाख २७ हजाराचा चुना लागला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. असून आरोपी कंपनी मेनेजर हरिष कारवा आणि योगेश शहा यांनी न्यायलयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज ठाणे सत्र न्यायालयाचे  न्यायमूर्ती एच एम पटवर्धन यांच्या न्यायालयात केला. न्यायालयाने जामिनास नकार देत अंतरिम जमीन मंजूर केला. पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार आहे.
हिरानंदानी मेडोज येथे राहणारे अशोक चौधरी हे पाचपाखाडी,रवी इंडस्ट्रीयल मधील में.सोनू कार्गो मुव्हर्सचे संचालक आहेत. त्यांच्या कंपनीत हरिष कारवा हे जनरल मेनेजर आहेत.याच कारवा याने कंपनीची दिशाभूल करीत साथीदार शाह याच्या मदतीने स्वस्त दरात कांदा खरेदी करून भाव वाढेल तेव्हा विक्री करून नफा कमावण्याचे प्रलोभन चौधरी यांना दाखवले.त्यानुसार,मध्यप्रदेश सरकारकडील कांदा लिलावाद्वारे खरेदी करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने शाह याला में.सनशाईन लॉजिस्टिक या नावाने व्यवसाय करण्याची मुभा दिली होती.त्यानंतर,12 जुलै 2017 रोजी मध्यप्रदेश राज्यातील देवास येथे आरटीजीएसद्वारे कोट्यवधीची रक्कम अदा करून शेकडो टन कांदा खरेदी केला.मात्र,मागवलेला हा कांदा सडलेला असल्याचे भासवून कांद्याची परस्पर विक्री करून रक्कमेचा अपहार केला.त्यानुसार,चौधरी यांच्या तक्रारीवरून नौपाडा पोलिसात कारवा आणि शाह या दुकलीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सहा.पोलीस निरीक्षक व्ही.आर. बनकर अधिक तपास करीत आहेत. याच प्रकरणात बुधवारी शहा आणि कारवा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत त्यांना अंतरिम जमीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ मे२ रोजी पुन्हा न्यायमूर्ती एच एम पटवर्धन यांच्या न्यायलयात होणार आहे.