* माजी पोलीस महासंचालक श्री रघुवंशी, अतिरिक्त आयुक्त जाधव, शिंदे, माजी उपकुलगुरू चंद्रा, पोलीस उपायुक्त गुंजाळ, कर्नल जोशी यांची उपस्थिती
कल्याण, 22 – २६ नोव्हेंबर रोजी ७४ व्या संविधान दिनाच्या निमित्ताने तसेच 26/11 च्या मुंबई येथील बॉम्बच्या प्राणघातक हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, सकाळी ठीक ८.३० वाजता कल्याणच्या शिवाजी चौकापासून ते प्रेम ऑटो जवळील साई निर्वाण दरम्यान ‘लोकशाहीसोबत चाला’ या उद्देशाने मॅरेथॉन रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
शेठ हिराचंद मुथा कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, मुथा फाउंडेशन, शेठ हिराचंद मुथा स्कूल, कमलादेवी कॉलेज, कल्याण डिस्ट्रिक बार असोसीएशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमास माजी पोलीस महासंचालक श्री के.पी. रघुवंशी, ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री संजय जाधव, श्री दत्तात्रेय शिंदे, कर्नल तुषार जोशी, मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू श्री नरेश चंद्रा, पोलीस उपायुक्त श्री सचिन गुंजाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आयोजक आणि शेठ हिराचंद मुथा शैक्षणिक ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश मुथा, कमलादेवी शैक्षणिक ट्रस्ट अधक्ष सदानंद तिवारी, कल्याण जिल्हा बार असोसिएशन अध्यक्ष प्रकाश जगताप यांनी दिली.
२६ नोव्हेंबर रोजी कल्याणच्या शिवाजी चौक येथून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून, संविधानास अभिवादन करून सुरू करण्यात येईल. ही रॅली प्रेम ऑटो जवळील साई निर्वाण येथे विसर्जित होईल. सदर रॅली मध्ये विद्यार्थी, समाजातील विविध वयोगटातील नागरिक सहभागी होणार आहेत.