Friday, May 24 2019 9:33 am

२२ मार्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रा.प्रदीप ढवळ यांचे “शिवप्रेरणा” व्याख्यान

ठाणे:शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व तर्फे गेली ५१ वर्ष छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते, मंडळातर्फे साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंती उत्सवाचे हे ५२वे वर्ष असून, यावर्षी  शुक्रवार दि २२ मार्च २०१९ रोजी  छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सायं ठीक ७ वा कादंबरीकार,नाटककार आणी इतिहास अभ्यासक प्रा.प्रदीप ढवळ यांचे “शिवप्रेरणा”या विषयावर व्याख्यान  ठाणे महानगरपालिका शाळा क्र.९, हरिश्चंद्र राऊत शाळा, श्री आंनद भारती महाराज चौक, चेंदणी कोळीवाडा, ठाणे पूर्व येथे आयोजित केले आहे.सर्व शिवप्रेमी नागरिकांना या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले आहे