Sunday, August 9 2020 11:39 am

२१ वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मिळाले तीन जणाना जीवदान २०१९ मधील मुंबईतील ७३वे अवयव दान शक्‍य

नवी मुंबई : प्रथम वाशी येथील फोर्टिस सहयोगी हिरानंदानी हॉस्पिटलमध्‍ये गुडघ्‍याची वाटी आणि डायफिसि‍सचे (दोन्‍ही बाजूचे) हाड दान करण्‍यात आले आहे  अवयवदात्‍याच्‍या वडिलांची त्‍यांचा ब्रेन-डेड मुलाचे यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया व हाडे दान करण्‍याला मंजूरी दिली.

वाशी येथील फोर्टिस सहयोगी हिरानंदानी हॉस्पिटलमध्‍ये मुंबईतील ७३वे अवयव दान करण्‍यात आले. वाशी, नवी मुंबई येथील २१ वर्षीय मृत तरुणाच्‍या वडिलांनी आपल्‍या लाडक्‍या मुलाचे यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया, गुडघ्‍याची वाटी आणि डायफिसिस दान करण्‍याला संमती दिल्‍यानंतर हे अवयव दान शक्‍य झाले. वडिलांच्‍या या धाडसी निर्णयाने शेवटच्‍या टप्‍प्‍यावर अवयव निकामी असण्‍याच्‍या स्थितीमध्‍ये असलेल्‍या तीन रूग्‍णांना नवीन जीवनदान मिळाले.

नवी मुंबईत राहत असलेल्या या २१ वर्षीय दात्याला रस्‍त्‍यावरील अपघातामुळे ब्रेन हॅमरेज झाले होते आणि त्‍याला दुस-या हॉस्पिटलमधून वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्‍ये आणण्‍यात आले. या तरूण रूग्‍णाला ब्रेन डेड घोषित करण्‍यात आले. कुटुंबाला अवयव दानाच्‍या संकल्‍पनेबाबत माहित होते. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्‍यांनी कुटुंबाला संपूर्ण प्रक्रिया स्‍पष्‍ट केली. त्‍यांनी त्‍यांच्‍या मृत मुलाचे यकृत, मूत्रपिंड, कॉर्निया, गुडघ्‍याची वाटी व डायफिसिस (दोन्‍ही बाजूचे) दान करण्‍याला संमती दिली. या तरूण दात्‍याच्‍या कुटुंबामध्‍ये आईवडिल व दोन भावंडे आहेत.

हार्वेस्‍टेड मूत्रपिंड यशस्‍वीरित्‍या वाशी, नवी मुंबई येथील १९ वर्षीय पुरूष प्राप्‍तकर्त्‍यामध्‍ये प्रत्‍यारोपित करण्‍यात आले. प्रत्‍यारोपण करण्‍याच्‍या टीममध्‍ये वाशी येथील हिरानंदानी हॉस्पिटलमधील कन्‍सल्‍टण्‍ट युरो‍लॉजिस्‍ट डॉ. सुमित मेहता, सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट एचपीबी अण्‍ड ट्रान्‍सप्‍लाण्‍ट सर्जरी डॉ. राकेश राय आणि सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट नेफ्रोलॉजिस्‍ट डॉ. अतुल इंगळे हे होते. प्राप्‍तकर्ता रूग्‍ण अंतिम टप्‍प्‍यातील रेनल डिसीजने (मूत्रपिंडसंबंधी आजार) पीडित होता आणि तो गेल्‍या तीन वर्षांपासून अवयव प्रत्‍यारोपणाच्‍या प्रतिक्षेत होता. कॉर्निया आय बँकमध्‍ये पाठवण्‍यात आल्‍या, दान करण्‍यात आलेली हाडे बोन बँकमध्‍ये पाठवण्‍यात आली आणि यकृत व मूत्रपिंड मुंबईतील दुस-या हॉस्पिटलमध्‍ये पाठवण्‍यात आले.

मृताचे अवयव दान आणि सोबतच मूत्रपिंड प्रत्‍यारोपणाबाबत बोलताना वाशी येथील फोर्टिस सहयोगी हॉस्पिटल – हिरानंदानी हॉस्पिटलमधील फॅसिलिटी डायरेक्‍टर संदीप गुदूरू म्‍हणाले, आम्‍ही गेल्‍या काही वर्षांमध्‍ये पाच मृतांचे अवयव दान आणि चार जिवंत दात्‍यांचे यकृत प्रत्‍यारोपणे केली आहेत. समाज अवयव दानाच्‍या थोर कार्याप्रती जागरूक झाले असल्‍याचे पाहून खूप धन्‍य वाटते. या कुटुंबांच्‍या धाडसी निर्णयाने अनेक जीव वाचवण्‍यामध्‍ये आणि त्‍यांच्‍या जीवनात बदल घडवून आणण्‍यामध्‍ये मदत झाली आहे. आम्‍ही आमच्‍या तरूण दात्‍याच्‍या वडिलांचे ऋणी आहोत.

रूग्‍णाच्‍या सध्‍याच्‍या स्थितीबाबत बोलताना प्रत्‍यारोण केलेले सर्जन्‍स व फिजिशियन्‍स म्‍हणाले,”प्राप्‍तकर्ता रूग्‍ण आयसीयूमध्‍ये आहे. रूग्‍ण चोवीस तास देखरेखीखाली आहे आणि तो लवकर बरा होत आहे.