Tuesday, March 26 2019 1:31 pm

२०१९ साली व्हॉट्सऍप चे नविन फीचर्स  

मुंबई : रोजच्या वापरातील सोशल मिडीयाचा व प्रत्येकाचा एक अविभाज्य भाग म्हणून उदयास आलेल्या ‘क्मुनिकेष्न’ ची क्रांती म्हणून ओळखली जाणाऱ्या व्हॉट्सऍपने युजर्ससाठी स्वतःच्या प्रायोरिटीच्या उद्देशाने  2018 या वर्षांत व्हॉट्सऍपने युजर्ससाठी अनेक नवनवे फिचर्स आणले. यावर्षीदेखील व्हॉट्सऍपकडे युजर्ससाठी नवनव्या फिचर्स् आहेत. काही फिचर्सचे टेस्टींग पूर्ण झाले आहे. तर काही फिचर्सचे टेस्टींग सुरू आहे. आगामी काळात टप्प्या टप्प्याने टेस्टींग पूर्ण करून नवे फिचर्स युजर्सच्या मोबाईलवर दाखल होतील.

2019मध्ये व्हॉट्सऍप येणारे नवे फिचर्स

1.मेसेज प्रीव्हय़ू :  मेसेज सेंड केल्यानंतर कसा दिसेल हे मेसेज सेंड करण्यापूर्वी पाहता येईल. त्यासाठी मेसेज प्रीव्हय़ू हे फिचर वापरता येईल.

2. नोटीफिकेशनमध्ये व्हिडीओ पाहा : व्हॉट्सऍपवर आलेला व्हिडीओ मोबाईलच्या नोटीफिकेशनमध्ये पाहता येऊ शकतो. या फिचरच्या मदतीमुळे आपण व्हिडीओ पाहिला असला तरी आपण तो व्हिडीओ पाहिला आहे, ही गोष्ट मेसेज पाठवणाऱयाला समजणार नाही.

3. व्हॉट्सऍप लिंक अकाऊंट : सध्या या फिचरचे टेस्टींग चालू आहे. व्हॉट्सऍपद्वारे बिझनेस करणाऱया लोकांनी एकापेक्षा अधिक अकाऊंट एकमेकांशी जोडले तर त्याचा त्यांना अधिक फायदा होईल. अशा लोकांसाठी व्हॉट्सऍप लिंक अकाऊंट हे नवे फिचर युजर्सना मिळणार आहे.

4. डार्क मोड : डार्क मोड हे फिचर सध्या ट्विटर, यूटय़ूब, गुगल मॅप्स आणि गुगल मेसेज या ऍप्समध्ये आहे. व्हॉट्सऍपही या फिचरची टेस्ट करत आहे.

5. एका वेळी अनेक व्हॉईस मेसेज ऐकता येतील : सध्या एका वेळी एकच व्हॉईस मेसेज ऐकता येतो, प्रत्येक व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्रत्येक वेळी प्ले करावे लागते. ही समस्या आता सुटेल.

6. स्टिकर्स सर्च करता येतील : एखाद्या प्रसंगी चॅट करताना हवे ते स्टिकर आपल्याला सापडत नाही. त्यामुळे व्हॉट्सऍप स्टिकर सर्चचा नवा ऑप्शन घेऊन येईल.

7. व्हॅकेशन मोड, सायलेंड मोड : आपण फिरायला गेलो, सुट्टीवर असू तेव्हा व्हॉट्सऍप मेसेजेसमुळे डिस्टर्ब होतो. अशा वेळी मेसेजेसच्या त्रासापासून सुट्टी मिळवण्यासाठी व्हॅकेशन मोड किंवा सायलेंट मोड हे नवे फिचर दाखल होणार आहे.

8. क्यूआर (QR) कोडच्या मदतीने शेअरिंग करता येईल :  क्यूआर कोडच्या मदतीने कॉन्टॅक्ट्स किंवा फाईल्स शेअर करता येतील.

9. मल्टी शेअर फाईल्स : या फिचरच्या मदतीने एकावेळी पीडीएफ, ऑडिओ आणि एकापेक्षा अधिक कॉन्टॅक्ट्स शेअर करता येतील.