Saturday, August 24 2019 11:28 pm

१७ मे रोजी मनसेचा ठाण्यात शेतकरी महामोर्चा

ठाणे – ठाण्यात मनसे-भाजपचा आंब्याच्या  स्टॉल वरून तुफान राडा झाला होता. शेतकऱ्यांना आंबा विकण्यास विरोध करणाऱ्या भाजप पक्षा विरुद्ध मनसेकडून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी ठाण्यात येत्या शुक्रवारी  १७ मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा शेतकरी महामोर्चा शुक्रवारी दुपारी १ वाजता असून  गावदेवी मैदान ते ठाणे महानगरपालिका असा या मोर्चेचा मार्ग असणार आहे

  मनसेचे पालघर आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोर्चे बद्दल सांगितले.या परिषदेत  अविनाश जाधव यांनी  मोर्चाला मनसेचे नेते तसेच राज्यभरातून किमान 5 हजार शेतकरीला उपस्थित राहतील  असा विश्वास  व्यक्त केला आहे

 आंबा स्टॉल लावल्याने भाजपा नगरसेवकाकडून सचिन मोरे या शेतकऱ्याला 20 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे शेतकऱ्याने देण्यास नकार दिल्याने पालिकेकडून या शेतकऱ्याच्या स्टॉलवर कारवाई करण्यात आली.असे   यावेळी अविनाश जाधव म्हणाले. आंबा स्टॉलसाठी परवानगी मागितली असताना ती नाकारण्याचं कोणतंही ठोस कारण महापालिकेकडे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी येत्या 17 मे रोजी ठाण्यात शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितले.  या शेतकरी मोर्चासाठी नाशिकहून राहुल ढिकले, पुण्याहून बाबाराजे जाधवराव, मराठवाड्यातून जावेद शेख, कोकणातून वैभव खेडेकर या मनसे नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी ठाण्यात दाखल होतील. तसेच ठाणे जिल्ह्यातील शेतकरी, आदिवासी,  ग्रामपंचायत सदस्य मोर्चात सहभागी होतील. या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या मोर्चाला पाठिंबा दिल्याचं अविनाश जाधव यांनी सांगितले.
या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ठाण्यातील विविध मैदानात शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात 18मे पासून टँकर बंद करण्याचा इशारा देत टँकर माफियाना अभय देण्यासाठी पाणी टंचाई, ठामपाचे पैसे घालवता कुठे? असा सवाल मनसेचे अविनाश जाधव यांनी विचारला आहे.