Tuesday, July 23 2019 2:44 am

१४ लाख १५ हजारांच्या स्त्रीधन आणि पैशाचा अपहार करत विवाहितेचा छळ

७ वर्षीय विवाहितेचा शाररिक आणि मानसिक छळ करीत तिच्याजवळ असलेले १४ लाख १५ हजाराचे स्त्रीधन धमकावून काढून घेत तिला मरणयातना देणाऱ्या पती सचिन मोरे यांच्यासह सासू आणि सासरे अशा तिघाजणांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलीस सूत्रांनी माहिती दिली.
                    विवाहिता आणि सचिन यांचा विवाह फेब्रुवारी, २०१७ रोजी झाला होता.  लग्नानंतर नोकरी करून चांगल्या भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या कोपरीतील २७ वर्षीय विवाहितेचा मानसिक छळ करून नांदवणार नाही अशी धमकी देत तिचे जवळपास १४ लाख १५ हजार रुपयांचे स्त्रीधन आणि बचत खात्यातील रक्कम काढून घेवून तिला वारंवार त्रास देणाऱ्या तिच्या पती सचिन मोरे सासरे सुरेश मोरे आणि सासू स्मिता मोरे यांच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास कोपरी पोलीस करत आहेत.