Wednesday, February 26 2020 8:51 am

१० वी पर्यंत एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे अपघातात निधन

पुणे :- पुणे  सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रक चा भीषण अपघात झाला असून या अपघातात  कारमधील ९ महाविद्यालयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला.  पहाटे  दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून  लोनी काळभोर वाक वस्ती येथे  पुणे-सोलापूर मार्गावर अपघात घडला.   महाविद्यालयीन तरुण हे  रायगडला सहलीला गेले होते. सहलीवरून घरी परतत असताना लोणी काळभोर येथे काळाने या तरुणांवर झडप घातली.पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास इर्टीका कार ही यवतच्या दिशेने जात होती. लोनी काळभोर वाक वस्ती येथे कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावरून पलीकडच्या मार्गावर कार गेली. त्याच वेळेस शहराच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने कारला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रकने कारला सुमारे शंभर फूट फरफटत नेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर कारमधील मृतदेह बाहेर काढणे अडचणीचे झाले होते. यामधील सर्व मृतदेह ही यवत परिसरातील रहिवासी आहेत.