मुंबई, २८: होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर आणि पनवेल-छापरा दरम्यान आणखी १० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः
*१. मुंबई-गोरखपूर एसी स्पेशल (४ सेवा)*
गाडी क्र. ०२५९८ एसी होळी स्पेशल लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ०५.०३.२०२३ आणि १२.०३.२०२३ रोजी १२.४५ वाजता सुटेल आणि तिसर्याम दिवशी ०.३० वाजता गोरखपूरला पोहोचेल.
गाडी क्र. ०२५९७ एसी होळी स्पेशल गोरखपूरहून ०३.०३.२०२३ आणि १०.०३.२०२३ रोजी २०.५५ वाजता सुटेल आणि तिसर्याु दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनसला ०७.२५ वाजता पोहोचेल.
*थांबे:* कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, चित्रकूट धाम, बांदा, रगौल, भारवा सुमेरपूर, कानपूर सेंट्रल, ऐशबाग, बादशाहनगर, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद
*संरचना:* चार द्वितीय वातानुकूलित, १४ तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन.
*२ . पनवेल-छपरा स्पेशल (६ सेवा)*
०५१९४ विशेष गाडी ०३.०३.२०२३ ते १७.०३.२०२३ पर्यंत दर शुक्रवारी २२.५० वाजता पनवेलहून सुटेल आणि तिसर्याप दिवशी ०८.५० वाजता छपरा येथे पोहोचेल.
०५१९३ विशेष गाडी ०२.०३.२०२३ ते १६.०३.२०२३ पर्यंत दर गुरुवारी १५.२० वाजता छपरा येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी २१.०० वाजता पनवेलला पोहोचेल.
*थांबे:* कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज जंक्शन, बनारस, वाराणसी, ज्ञानपूर शहर आणि बलिया.
*संरचना:* दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, ९ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी दोन गार्डच्या ब्रेक व्हॅनसह.
*आरक्षण:* ट्रेन क्र.*०५१९४ आणि ०२५९८* साठी विशेष शुल्कावर बुकिंग *01.03.2023* रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
प्रवाशांना त्यांच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तनाचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
——–