Friday, May 24 2019 8:22 am

हेलिकॉप्टर अपघातात २ वैमानिकांसह ६ जवान शहीद ,नाशिक चा निनाद मांडवगणे शहीद

श्रीनगर : २६ फेब्रुवारीला पाक मध्ये इंडियन एअरफोर्स ने केलेल्या यशस्वी हल्ल्यानंतर भारतीय सीमेचे रक्षण करत असताना श्रीनगरमध्ये हेलिकॉप्टर अपघातात एअरफोर्समधील नाशिकचे पायलट निनाद मांडवगणे शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरच्या बडगाममध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टर मध्ये २ वैमानिकांसह ६ जवान शहीद झाले. या घटनेत नाशिकचे पायलट स्कॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे हे देखील शहीद झाले. त्यांच्या मागे त्यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची मुलगी, आई वडील आणि धाकटा भाऊ असे कुटुंब आहे. या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले.
निनाद हे नाशिक येथील रहिवासी होते. निनादचे वडील बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करत होते. आता ते सेवानिवृत्त झाले असून आईही सेवेतून सेवानिवृत्त झाली आहे. निनाद हा त्यांचा मोठा मुलगा असून लहान मुलगा जर्मनीत सी. ए. पदावर सेवेत आहे. आमच्या कुटुंबाचा आधारच गेला अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी दिली आहे.
नाशिकच्या डीजीपीनगर जवळील बँक ऑफ इंडिया कॉलनीत त्यांचे आई वडील राहतात. नोकरी निमित्ताने ते लखनऊमध्ये पत्नी आणि मुलीसोबत राहत होते. सध्या त्यांचे पोस्टिंग श्रीनगरला होते. औरंगबादच्या सैनिकी सेवा पूर्व संस्थेच्या (एसपीआय) २६ व्या कोर्सचे विद्यार्थी होते. तिथून त्यांची निवड पुणे येथे एनडीएत झाली आणि ते हेलिकॉप्टर पायलट झाले.  २००९ मध्ये तो एअरफोर्स मध्ये दाखल झाले होते. एअरफोर्समध्ये स्कॉड्रन लीडर पदावर सेवेत रुजू होऊन गुवाहाटी, गोरखपूर येथे सेवा करून एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती.
सध्या भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असल्यानं कर्तव्य पार पाडत असताना काल ही दुर्घटना घडली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. देशभरातुन निनाद यांना श्रद्धांजलि वाहिली जाते.
निनादने आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठं केलं आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असल्याची भावना निनादच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.