Tuesday, July 23 2019 2:03 am

हिरानंदानी बिल्डरकडे खंडणी मागितल्याप्रकरणी भाजपचा माजी नगरसेवक अटकेत

ठाणे : प्रख्यात बिल्डर हिरानंदानी यांच्या ठाण्यातील पातलीपाडा येथील प्रकल्पासाठी सर्व्हिस रोडची जागा गिळंकृत केल्याबाबतची तक्रार करण्यासाठीमाहिती अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्यापकारणी भाजपच्या माजी नगरसेवकाला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.यापूर्वीठाण्यातील माजी नगरसेवक सुधीर बर्गे ययांच्यासह प्रदीप पाटील यानाही हिरानंदानीकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक केली होती.दरम्यान,या खंडणी प्रकरणी आणखी काही आजीमाजी नगरसेवक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  हिरानंदानी यांच्याकडून 50 लाख खंडणीची मागणी बर्गे यांनी हिरानंदानी बिल्डरचे सिक्युरिटी ऑफिसर असलेल्या गुरव यांच्याकडे केली होती.या प्रकरणी 26 ऑक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने माजी नगरसेवक सुधीर बर्गे याला शनिवारी अटक केली होती.त्यानंतर आरटीआय टाकणारे माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप पाटील यालाही याचप्रकणात अटक केल्यानंतरखंडणी विरोधी पथकाने गुरुवारी भाजपच्या राजकुमार यादव या माजी नगरसेवकास अटक केली.अशी माहिती पोलिसांनी दिली.