Saturday, August 24 2019 11:50 pm

हिम्मत असेल तर मलाही अटक करा; आ. जितेंद्र आव्हाडांचे आव्हान

ठाणे :-  हिमंत असेल तर मलाही अटक करा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटरद्वारे दिले आहे. मोदी आणि साध्वीच्या विरोधात पोस्ट टाकली म्हणून विक्रोळी येथील डॉ. निषाद यांना अटक करण्यात आली आहे. मी देखील डॉ. निषाद यांचे समर्थन करीत आहे.त्यामुळे मला हि अटक करा असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केले आहे.
फेसबुकवर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरोधातही पोस्ट शेअर करणारे डॉ.  सुनीलकुमार निषाद यांना विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा आ. आव्हाड यांनी ट्वीटरद्वारे निषेध करुन आपल्या अटकेचे आव्हान दिले आहे.
आ. आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये डॉ. निषाद यांची पोस्ट शेअर करुन, एससी, एसटी, ओबीसी हे हिंदूधर्मात मजूर झाले आहेत; असे निषाद यांचेच म्हणणे नसून ते माझेही म्हणणे आहे. डॉ. निषाद यांनी आपल्या पोस्टमधून प्रज्ञा ठाकूर आणि मनुवादी विचारधारेवर आगपाखड केली आहे. आपणही तसेच करीत आहोत. त्यामुळे जर हिम्मत असेल तर मलाही अटक करा, असे आव्हान आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.