Sunday, August 9 2020 11:15 am

हिंमत असेल तर पकडून दाखवा; मुंबई पोलिसांना आव्हान

मुंबई : हिंमत असेल तर पकडून दाखवा असे मुंबई पोलिसांना आव्हान करणाऱ्या अती हुशार चोराला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा अती हुशार चोर लॅपटॉप, मोबाईल, आयपॅडसारख्या महागड्या सामानाची चोरी करायचा . सोनू बनिया कुमार असं या चोराचं नाव आहे.

आरोपी सोनू कुमारने पोलिसांना आव्हान दिल्यानंतर आपला साथीदार सुनील कुमारसोबत मुंबईतील शिवडी परिसरात एका कारची काच तोडून महागडा ऐवज लंपास केला. कारच्या आत असलेले पैसे, लॅपटॉप, आयपॅडसह अन्य सामानाच्या चोरीनंतर पुन्हा मुंबई पोलिसांना या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

या चोराविरोधात भायखळा, आझाद मैदान, एमआरए मार्ग, व्हिपी रोड, माणिकपुरा आणि ठाणे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांनी आपली एक विशेष टीम या चोराच्या मागावर तैनात केली होती.

या चोराने जेलमध्ये असताना चोरीचे अनेक फंडे शिकून घेतले होते. तसंच पोलिस कसं काम करतात यावरही या चोरट्याची नजर असायची. पोलिसांना आव्हान देणारा हा चोरटा गेले अनेक महिने गुंगारा देत होता. अखेर पोलिसांनी विशेष टीम बनवत या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.