नुपूर शर्माच्या समर्थनार्थ घोषणाबाजी..
ठाणे : हिंदू समाजावर गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि मुस्लीमचा वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपसून हिंदू समाजावर दगडफेक केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. त्याच बरोबर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या शिष्ट मंडळाने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यासाठी पत्र देखील दिले. यावेळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी दरम्यान नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी करण्यात आली.
गेले अनेक दिवस हिंदू मुस्लिम वाद चव्हाट्यावर आला असताना आता हिंदूंवर होणाऱ्या भ्याड हल्ले होत आहेत. या हल्यांच्या निषेधार्थ बजरं दल आणि वैष्णव हिंदू परिषद रस्त्यावर उतरले असून ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या माध्यमातून घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांवर कोणीही कारवाही करत नाही आणि हिंदूंनी काही बोलला तर मोठं मोठ्या कारवाई केल्या जातात असा आरोप बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी हिंदूंच्या समर्थनार्थ पत्र राष्ट्रपतींना देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. हिंदूवरचे भ्याड हल्ले थांबले नाहीत तर देशभरात निदर्शने करू असा इशारा देखील दोन्ही संघटनेनकडून देण्यात आला.
हिंदू समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले होत आहेत. त्यात राम नवमी यात्रा, हिंदू नववर्षाची यात्रा काढली त्यात दगडफेक करण्यात आली. वेगवेगळी कारण देऊन समाजातील वातावरण बिघडवण्याच प्रयत्न सुरु आहे. एक इस्लामिक जिहाद पूर्ण पणे मांडला जात असल्याचा आरोप यावेळी विश्वहिंदू परिषद आणि बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. याला कुठेतरी चाप बसावा यासाठी निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना एक निवेदन देखील देण्यात आले आहे. या निवेदनाच्या माध्यमातून हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्याच्या सरकारला निर्देश देऊन कडक कारवाईच्या सूचना देण्याची मागणी केली आहे. जर अशा प्रकारे कडक कारवाई झाली नाही तर समाजात तेड निर्माण होऊन पुढे जाऊन खूप मोठा परिणाम होऊ शकतो अशी मागणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात आली असल्याचे बजरंग दलचे पदाधिकारी विश्वास सावंत यांनी सांगितले.
यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान आंदोलन कर्त्यांनी नुपर शर्मा यांच्या समर्थनार्थ देखील घोषणाबाजी केली. यावेळी ‘नुपूर शर्मा के सन्मान में बजरंग दर मैदान मे’, ‘नुपूर शर्मा आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी देखील केली.