Monday, June 17 2019 4:18 am

हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प !

मुंबई- : हार्बर रेल्वे मार्गावरिल वाहतूक ठप्प झाली आहे. हार्बर मार्गावर मानसरोवर स्टेशनजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. हार्बर लाईनवरील वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाश्यांचे मोठे हाल होत आहेत.

हार्बर मार्गावरील मानसरोवर स्थानकावर ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. दरम्यान गेल्या दीड तासापासून ही वाहतूक खोळंबली आहे. त्यामुळे कामाच्या घाईत घराबाहेर पडणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सध्या वायर दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. पण वाहतूक सुरू होण्यासाठी दुपारचे 12 किंवा 1 वाजतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही जर आता हार्बर मार्गाने प्रवास करत असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या आणि मगच प्रवास करा.