Friday, May 24 2019 9:05 am

हाजुरीतील क्लस्टर योजनेतून वगळलेल्याचा कांगावा सुरूच !

ठाणे :  ठाण्याच्या हाजूरी परिसरातील सामूहिक विकास योजनेतून वगळण्यात आलेल्या रहिवाशांचा क्लस्टरला विरोध आहे. पालिका प्रशासनाने क्लस्टरला विरोध करणाऱ्या काही लोकांना वगळून सर्व्हे आणि बायोमेट्रिक सर्व्हेचे काम पूर्ण केले. आता विरोधक हे पालिका अधिकाऱ्यांच्या मागे माहितीचा ससेमिरा लावून त्रास देत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.        

ठाण्याच्या हजारी भागात सामूहिक विकास योजना राबविण्यात आली तब्बल १२०० कुटुंबाच्या प्रकल्पात 40 ते 50 लोकांनी विरोध दर्शविला. हाजुरीतील सर्व्हे आणि बायोमेट्रिक सर्व्हेला विरोध केल्यानंतर पालिका प्रशासनाने विरोध करणाऱ्या नागरिकांचा सर्व्हे न करता त्यांना वगळून प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरळीत सुरु असलेल्या कामकाजात विरोध करणारे कागदी घोडे नाचवून तक्रारी करून माहिती मागून पालिका अधिकारी यांच्या मागे ससेमिरा लावला आहे. सामूहिक विकास योजनेतून वगळण्यात आलेल्या रहिवाशी आता पालिका अधिकाऱ्यांचा पाठलाग करून पालिकेची प्रकल्पातील लाभार्थ्यांची यादी जाहीर केली असताना यादी मागून पालिका अधिकाऱ्यांना त्रास देण्यात येत आहे. सामूहिक विकास योजनेतून वगळण्यात आलेल्या रहिवाशांना प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या मभर्थीची यादी हवी कशाला असा सूर पालिका अधिकारी काढीत आहेत. हजारी गावठाण सामाजिक संस्थेने प्रसिद्धी पत्रक काढून पालिका प्रशासन हे रहिवाशांना अंधारात ठेवून जबरदस्तीने लोकांवर क्लस्टर योजना लादत  असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे क्लस्टर योजनेतून बाहेर पडलेल्याना हरकती सूचना यासाठी एक महिन्याचा कालावधी असताना आणि समाविष्ट असलेल्या नागरिकांच्या नावाची यादी हवीय कशाला असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रशासन योजनेत समाविष्ट आणि वगळलेल्या नागरिकांना क्लस्टर योजनेबाबत माहितीच नसल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हण्टले आहे. दरम्यान अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या क्लस्टरचा उपापोह आणि विविध माहिती उपलब्ध असताना विरोध करणाऱ्यांनी  क्लस्टर बाबत माहिती नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे.

क्लस्टर योजनेची माहिती योजनेत समाविष्ट झालेल्या लोकांना माहित आहे. क्लस्टर योजनेत समाविष्ट नसलेल्या लोकांना यादीची आवशक्यता काय? तसेच यादीही  उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या समाविष्ट नागरिकांचा सर्व्हे, बायोमेट्रिक सर्व्हे करण्यात आलेला आहे. नुकत्याच निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने पालिका प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना प्रकल्पात समाविष्ट असलेल्या नागरिकांची यादी देत नसल्याचा कांगावा करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेच्या कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. ज्यांचा या योजनेला विरोध आहे त्या सर्वाना वगळून प्रशासनाने सर्व्हे केला आहे. तरीही काही लोक पालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करीत आहेत.                                           – मारुती गायकवाड(सहाय्यक आयुक्त नौपाडा प्रभाग समिती)