Monday, January 27 2020 3:58 pm

हर्षवर्धन पाटील यांचा आज भाजपमध्ये प्रवेश

मुंबई :-  काँग्रेसचे माजी मंत्री  हर्षवर्धन पाटील  यांनी आज  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये पक्ष प्रवेश केला. कालच हर्षवर्धन पाटील यांनी  काँग्रेस पक्षाला राजीनामा देत पक्षाला रामराम केले.  हर्षवर्धन पाटील हे भाजप पक्षातून  इंदापूरमधून लढणार असल्याची घोषणा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  आजचा दिवस ऐतिहासिक सांगतानाच तत्त्वाने काम करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं हर्षवर्धन यांनी सांगितलं.  मी तत्त्वाने वागणारा माणूस आहे; आमच्यासारख्या तत्त्वाने वागणाऱ्या माणसांसाठी आता भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असं सांगतानाच मी कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये आलो असून भाजपशिवाय सध्याच्या काळात पर्याय नाही, असंही हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत इंदापूरच्या जागेचा तिढा सुटत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.