Monday, January 27 2020 8:20 pm

 स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली :  भारताच्या  तिन्ही सुरक्षा दलांमध्ये  समन्वय राखण्यासाठी या तिन्ही दलांवर एक प्रमुख (Chief of Defence Staff) नेमला जाईल,  अशी घोषणा  ७३ व्या  स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी  आज किल्ल्यावर भाषण देत असताना केली.

देशाची सुरक्षा दले हा आपला अभिमान आहे. ही तिन्ही दले आणखी मजबूत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बदलत्या परिस्थितीत तिन्ही दलांमधील समन्वय वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तिन्ही सुरक्षा दलांमध्ये समन्वयक म्हणून ‘चीफ ऑफ डिफेस स्टाफ’ हे पद निर्माण केलं जाईल. या पदावरील व्यक्ती तिन्ही सैन्य दलाची प्रभारी म्हणून काम पाहील,’ असे आपल्या भाषणात मोदी यांनी सांगितलं.