ठाणे – गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयच्या भारतसरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्मार्ट सिटी मिशनचा ७ वा वर्धापन दिन २५ जून २०२२ रोजी साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने ‘सात वर्ष का हर्ष’ या कल्पनेअंतर्गत ठाणे स्मार्ट सिटी लि. विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती ठाणे स्मार्ट सिटी लि. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी दिली.
ठाणे स्मार्ट सिटी लि. च्या ‘सात वर्ष का हर्ष’ या कार्यक्रमात ठाणे शहरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या निमित्ताने विद्यार्थ्यांना ‘इंटलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टिम येथे सकाळी ११ ते ११.३० वा, इंटिग्रेटेड कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटर येथे १२ ते १२.३० वा., स्मार्ट वॉटर मिटर प्रकल्प येथे १ ते १.३० वा, मल्टी मोडल ट्रान्झीट हब येथे ११ ते ११.३० वा, कोपरी वॉटरफ्रंट ११.३० ते १२ वा , भूमिगत पार्किंग व्यवस्था- गावदेवी १२ ते १२.३० वा, कॅन्टीलिव्हर ग्लास ब्रिज – मासुंदा तलाव १२.३० ते १.०० वा., कोलशेत वॉटरफ्रंट येथे वृक्षारोपण’ आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांना प्रकल्पांची माहिती व प्रात्याक्षिक दाखविण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत् राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी हा या मागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाचा समारोप दुपारी ३.०० वा. ठाणे महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात होणार असून यावेळी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा ठाणे स्मार्ट सिटी लि. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.