Wednesday, April 23 2025 2:07 am

स्थानिकांना नोकऱ्या दिल्या नाही तर हॉस्पिटलला टाळा ठोकू …युवा सेनेचे नेते पुर्वेश सरनाईक यांचा इशारा*

ठाणे ०३ : वर्तकनगर येथे नव्याने सुरु होत असलेल्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये स्थानिक तरुण-तरुणींना नोकरी व रोजगार दिला नाही तर हॉस्पिटल सुरु होण्याआधीच हास्पिटलला टाळा ठोकू ! असा इशारा ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व युवासेनेचे नेते श्री. पुर्वेश सरनाईक यांनी दिला.

शुक्रवारी ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व युवासेनेचे नेते पुर्वेश सरनाईक यांच्या माध्यमातून स्थानिकांना नोकरी व रोजगार मिळावा यासाठी वर्तकनगर विभागात येथे नव्याने सुरु होत असलेल्या एम. एम. आर. चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथे आंदोलन करून निवेदन देण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. वर्तक नगर येथे एम. एम. आर. चिल्ड्रन्स हॉस्पिटल सुरु होत आहे. सदर ठिकाणी स्थानिक तरुण-तरुणींना शैक्षणिक पात्रता असतानाही नोकरी/रोजगारासाठी डावलण्यात येत असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या जवळ करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेत श्री. पुर्वेश सरनाईक यांनी स्थानिकांसहित हॉस्पिटलला धडक दिली. यावेळी श्री. पूर्वेश सरनाईक यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला निवेदन दिले व या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात ४८ तासांचा अवधी दिला आहे. जर व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली नाही तर हॉस्पिटल सुरु होण्याआधीच हॉस्पिटलला टाळा ठोकू असा इशारा श्री. पुर्वेश सरनाईक यांनी दिला आहे.

यावेळी शिवसेना विभागप्रमुख रामचंद्र गुरव, शिवसेनेचे संदीप डोंगरे, भगवान देवकते, विराज निकम, सुशांत मयेकर, रमेश सांडभोर, संतोष ढमाले, जितीन सावंत, राकेश यादव, गणेश तांबे, विशाल कुडिया, राकेश जैस्वार, बाळू जाधव, तेजस फाटक, साई ढवळे, मनोज अहिर, सुजय पाटील, निलेश चव्हाण, निलेश कारंडे, प्रमोद भिसे, मछिंद्र सुतार आणि स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.