Friday, November 22 2019 7:59 am
ताजी बातमी

स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला पंतप्रधानांकडून आदरांजली

गुजरात :-  देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुतळय़ाला आदरांजली वाहिली आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्वातंत्र्यलढय़ात सरदार पटेल यांचा मोठा वाटा होता. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतही त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून गेल्या वषी त्यांचा पुतळा गुजरात या ठिकाणी उभारण्यात आला. या पुतळय़ाला स्टॅच्यू ऑफ युनिटी असे नाव देण्यात आले आहे. हा पुतळा न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही मोठा आहे.

सरदार वल्लभभाई पटेल हे वकील होते. वकीली करत असताना वर महात्मा गांधीच्या विचारांचा प्रभाव सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वर पडला. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या जडणघडणीतही त्यांचे योगदान मोठे होते.