Monday, January 27 2020 1:57 pm

सोन्याचा मुलामा असलेली पावलं एका भक्ताने लालबागच्या राजाला केली अर्पण

मुंबई :- दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने लालबागच्या राजा ला भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किवा नवस पूर्ण करण्यसाठी सोन्या चांदीच्या वस्तू दान करत असतात. यावर्षी एका गणेश भक्ताने लालबागच्या राजाला  सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पावलं अर्पण केली तर  दुसऱ्या एका भक्ताने सोन्याची अंगठी दान केली आहे. त्यामुळे या  सोन्याचा मुलामा असलेली चांदीची पावलं पाहण्यसाठी भाक्तंनी एकच गर्दी केली होती. आठ दिवस उलटल्यानंतरही लालबागच्या राजा चरणी सोनं, चांदी अर्पण करण्यात येत आहे. अनेक भाविक निनावी दान देत आहेत. अशाच एका भक्ताने काल रविवारी लालबागच्या राजा चरणी सोन्याचा मुलामा असलेली ही चांदीची पावलं दान केली आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. काल आणि आज पावसाचा जोर ओसरल्याने अनेक भाविकांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्यामुळे लालबाग परिसरात मोठी गर्दी झाली आहे. राजकारणी, सेलिब्रिटींसह देश-विदेशातील पर्यटकही विघ्नहर्त्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी लालबाग परिसरात दाखल झाले आहेत.