Tuesday, July 23 2019 2:06 am

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघींना अटक

ठाणे : उच्चंभ्रू वस्तीमध्ये आर्थिक मोबदला घेऊन सेक्स रॅकेट चालविणारी प्रिया जाधव (19) आणि या व्यवसायासाठी घर भाडयाने देणारी रेखा अरोरा (60) अशा दोघींना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक  प्रतिबंध कक्षाच्या पथकाने बुधवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून 28 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्रिया नामक महिला फोन केल्यानंतर तीन हजार रुपयांच्या मोबदल्यात शरीरविक्रयासाठी महिलांना पाठविते, अशी माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कळव्यातील चिंचपाडा भागातील रमाबाई आंबेडकर बिंल्डींग पहिला मजला याठिकाणी 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास पथकाने कळवा पोलिसांसह संयुक्तरित्या केलेल्या धाडसत्रात  प्रिया आणि रेखा या दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. कळवा पोलीस ठाण्यात या दोघींविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
Tags: