Thursday, June 20 2019 2:34 pm

सुवर्णपदक विजेती मधुरिकाचे ठाणेकरांनी केले स्वागत

ठाणे:  प्रतिनिधी :— कॉमन वेल्थ गेममध्ये टेबल टेनिस खेळात सुवर्णपदक पटकाविणारी मुळची ठाणेकर असलेली मधुरिका पाटकर हीच ठाणेकरांनी मंगळवारी जल्लोषात अभिनव स्वागत केले. मुळची ठाणेकर असलेली मधुरिका हिच्या घवघवीत यशाने देशाला सुवर्णपदक मिळाल्याचा आणि त्यात ठाणेकर असलेल्या मधुरिकाचं असलेल्या योगदानाचा अभिमान ठाणेकरांना आहे. म्हणूनच ठाणेकरांनी मधुरीकाचे जल्लोषात स्वागत केले.
        मंगळवारी  ठाण्यातील आनंद नगर चेक नाका  येथे सुवर्णपदक विजेती मधुरिका पाटकर हिचे आगमन होताच ठाणेकरांनी  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच मधुरिकाला एका रथात बसवून  तिची विजयी मिरवणूक काढण्यात आली.  यावेळी ठाणेकरांनी एकच जल्लोष केला. त्याच रथातून तीची घरी रवानगी करण्यात आली . कॉमन वेल्थ गेम मध्ये यश मिळविल्या नंतर पुढे भविष्यात देखील स्पर्धत यश मिळविणार असल्याचा आत्मविश्वास मधुरीकाने ठाणेकरांसमोर व्यक्त केला. तर आगामी ऑलम्पिक स्पर्धेत देखील यश मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मधुरीकाने सांगितले. कॉमन वेल्थ गेममध्ये मिळालेलं यश सर्वांचेच असल्याचे मधुरीकाने सांगितलं. तर ठाणेकरांच्या अभिनव स्वागताने मधुरिका भारावली होती.