Tuesday, June 2 2020 2:48 am

सुप्रीम कोर्टाकडून मराठा समाजाला दिलासा;मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही

नवी दिल्ली :- मुंबई हायकोर्टाच्या  मराठा आरक्षणावरील निर्णयाला तुर्तास स्थगिती देता येणार असल्याचे सांगत मराठा समाजाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीतील अडथळा तुर्तास दूर झालाअसून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर  दोन आठवड्यांनंतर  सुनावणी होणार आहे.  मराठा आरक्षणाबाबतचा राज्य सरकारचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर  मुंबई हायकोर्टाने या निर्णयाला आरक्षण विरोधकांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. आज सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या निर्णयाला स्थिगिती देईल असे आरक्षणविरोधकाना वाटत होते.परंतु मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली असून शिक्षणात १२ टक्के, तर नोकऱ्यांमध्ये १३ टक्के इतके आरक्षण देण्याचे राज्य सरकारने सुरू केल्याचे राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात मांडले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आज स्थगिती न देता या प्रकरणी दोन आठवड्यांनंतर सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात डॉ. जयश्री पाटील यांच्या वतीने अॅड. डॉ. गणरत्न सदावर्ते यांनी सुप्रीम कोर्टात ही याचिका केली आहे. राजकीय फायद्यासाठी हे ईएसबीसी प्रवर्गाचे आरक्षण नियमबाह्य स्वरुपात दिले गेले असून ते रद्द करावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यात मुख्य प्रतिवादी करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी राज्य सरकारकडे दोन आठवड्यात उत्तर मागितले आहे.