Sunday, September 15 2019 11:12 am

सुप्रियाताई सुळेंशी टॅक्सीचालकाचे गैरवर्तन: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शने

ठाणे :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रियाताई सुळे यांच्याशी गैरवर्तन करणार्‍या टॅक्सीचालकावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
सुप्रिया सुळे काल देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करत होत्या. सुळे यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कुलजीतसिंह मल्होत्रा नावाचा टॅक्सी चालक दादर टर्मिनस येथे गाडीत प्रवेश करीत प्रवाशांना भाड्यासाठी हुज्जत घालत होता. मल्होत्राने सुप्रिया सुळेंना गाठले आणि तो त्यांच्याशी हुज्जत घालू लागला. सुळे यांनी त्याला दोनदा नकार दिला. मात्र, मल्होत्रा ऐकेचना. त्याने सुप्रिया सुळेना पुढे जाऊ न देता अडवून धरले.
या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे महिलाध्यक्षा सुजाता घाग यांच्या नेतृत्वाखाली काळ्या साड्या परिधान करुन निदर्शने केली. यावेळी महिला आंदोलकांनी गृहखात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, जो प्रकार मुंबईत घडला; तसाच प्रकार ठाण्यातही घडण्याची शक्यता असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा मागणीचे निवेदन यावेळी प्रशासनाला देण्यात आले. या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग म्हणाल्या की, सुप्रियाताई सुळे यांच्यासारख्या व्यक्तीला जर टॅक्सी चालक असा त्रास देत असतील तर सामान्य महिलांची सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे दिसत आहे. आज युती सरकारच्या काळात लहान मुली, तरुणी, महिला असुरक्षित असल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत या सरकारला महाराष्ट्रातील महिला खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत.
या आंदोलनात नगरसेविका प्रमिला केणी, अपर्णा साळवी, आरती गायकवाड, वहिदा खान, अंकिता शिंदे, फरझाना शेख,आशिरन राउत, रुपाली गोटे ;  महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ. ज्योती निंबरगी, शशिकला पुजारी, युवती अध्यक्षा प्रिंयका, महाराष्ट्र प्रदेश संघटिका सेवादल  सोनार विजया दामले, विधानसभाध्यक्ष मेहरबानो पटेल, पुनम वालीया कांता गजमल,  अनिता मोटे
18. स्मिता पारकर, वंदना लांडगे, वंदना हुंडारे, शुंभागी कोलपकर, सुवर्णा खिल्लारे, संगिता चंद्रवंशी, सुनिता पवार, मनिषा पाटील, अलका लोहकरे, पुजा धुरिया , मंजु येरुणकर, रंजना पारखे, सुजाता कदम, सारिका पगारे, दया गोहिल, कमला रेड्डी, मलंग जईबून्नीसा, निलोफर बांगी, यास्मिन शेख आदी महिला सहभागी झाल्या होत्या.