हरिश्चंद्र शिंपी यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे(प्रतिनिधी) ः ठाण्यात वास्तव्यास असणार्या सुधागड तालुका रहिवासी संघाच्यावतीने व टाटा कॅपिटलच्या सहकार्याने रविवारी सुधागडातील पाली येथील सुधागड तालुका मराठा समाज हॉल येथे विद्यार्थी व पालकांसाठी नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास सुधागड तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भागातील गावपाड्यांतून 300 विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला. मार्गदर्शक वक्ते श्री हरिश्चंद्र शिंपी यांनी विद्यार्थ्यांना दहावी-बारावीनंतर कोणते करीअर करता येईल याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फुर्त सहकार्यानंतर यापुढे गरीब-गरजू विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा मोफत कार्यशाळा घेण्याचे आश्वासन हरिश्चंद्र शिंपी यांनी दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व समन्वयक श्री बळीराम निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले व श्री सुजित जगताप शिक्षक ग. बा. वडेर यांनी सूत्रसंचालन केले शेवटी सरचिटणीस राजू पातेरे यांनी उपस्थितांचे आभारप्रदर्शन व्यक्त केले.
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे व टाटा कॅपिटल यांनी सुधागड तालुक्यातील 14 माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना विविध प्रकारची आर्थिक तसेच शैक्षणिक साहित्य देउन त्यांच्या शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन केले आहे. तसेच माध्यमिक शाळांतील अध्ययन-अध्यापन सुकर होण्यासाठी शाळांतील भौतिक सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून नुकताच दहावी-बारावीचा निकाल लागल्यानंतर मुलांनी शिक्षणासोबत नोकरी – व्यवसायातही यशस्वी व्हावे, त्यांना योग्य दिशा मिळावी म्हणून नामवंत करीअरविषयक मार्गदर्शक हरिश्चंद्र शिंपी व सहकारी विनोद कदम यांचे नोकरी-व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन सुधागड तालुका मराठा समाज भवन, पाली येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी महिनाभर आधीच तालुक्यातील युवक व विद्यार्थ्यांना प्रवेश नोंद करण्यासाठी संस्थेने ऑनलाईन लिंक तयार करून ती शिक्षक व कार्यकारी सदस्य यांच्यामार्फत संपर्क साधत शिबिरात येण्यासाठी सहकार्य केले. रविवार 19 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 2 वाजता ही कार्यशाळा संपन्न झाली.
सुजित जगताप, शिक्षक ग. बा. वडेर शाळा यांनी उपस्थितांचे स्वागत करून सूत्रसंचालन केले. अध्यक्ष विठ्ठल घाडगे यांनी कार्यशाळेची माहिती विद्यार्थी व पालकांना देताना सांगितले, बरेच मुलांना नोकरीसाठी जाताना आपला साधा रिझुमही भरता येत नाही. वय वर्षे 15 ते 21 वर्षे ही वयाची 6 वर्षे तुमचं करीअर घडविण्यासाठी उत्तम वेळ आहे. अनेक मुलं या वयात योग्य दिशा न मिळाल्याने भरकटत असतात. त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. शिक्षणासोबत मुलांनी जॉब ओरिएंटल होणे आवश्यक आहे. त्यांना शिक्षणाच्या, नोकरी-व्यवसायाच्या वाटा मिळायला हव्यात त्यासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व टाटा कॅपिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नोकरी-व्यवसाय कार्यशाळेेतून मुलांनी डिजीटल टेक्नॉलॉजी अवलंबत यशाकडे वाटचाल केली तर 21 व्या वर्षानंतर त्यांना योग्य दिशा सापडेल, असा विश्वास व्यक्त केला.
वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक- संपर्कप्रमुख श्री सुजित जगताप, मिलिंद शिंदे, नरेश शेडगे, सुचिर खाडे, सुधीर शिंदे, विक्रम काटकर, दीपक माळी परिश्रम घेतले.
यावेळी सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष गणपत सितापराव, उपाध्यक्ष गंगाधर जगताप, कार्यक्रमाचे समन्वयक बळीराम निंबाळकर सर, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्यासह सुधागड तालुका रहिवासी सेवा संघाचे ज्येष्ठ सल्लागार विठ्ठल खेरटकर, उपाध्यक्ष वसंत लहाने, उपाध्यक्ष शंकर काळभोर, सल्लागार गणपत डिगे, सरचिटणीस राजू पातेरे, खजिनदार विजय पवार, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, उपखजिनदार विजय जाधव, अंतर्गत हिशेब तपासनीस दत्तात्रय सागळे, क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे, प्रसिद्धीप्रमुख अजय जाधव, कार्यकारी सदस्य श्याम बगडे, भगवान तेलंगे, पत्रकार दत्तात्रय दळवी आदी उपस्थित होते.