Tuesday, December 1 2020 12:54 am

सीबीएसइ नॅशनल जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2019-20 स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व.

ठाणे: खेलगाव पब्लिक स्कुलप्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या  सीबीएसइ नॅशनल जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2019-20 रिदमीक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी लक्षणीय यश मिळवले. एकूण  13 सुवर्ण पदके ,  6 रजत आणि कांस्य पदके मिळवत या स्पर्धेवर आपला ठसा उमटवला.

11 वर्षांखालील गटात मृदुला पाटील सुवर्ण, 1 रजत14 वर्षाखालील गटात संयुक्ता काळे सुवर्ण, स्पृहा साहू रजत कांस्य,  इरा रावत रजत, 2 कांस्य, आर्या कदम कांस्य, 17 वर्षाखालील गटात अस्मि बदडे सुवर्ण,
दुर्गा रोकडे कांस्य अशा पदकांची कमाई केली

संयुक्ता,अस्मि स्पृहाआर्यादुर्गामृदुला  या सर्व मुली आंतरराष्ट्रीय खेळाडु कोच व पंच कु. पूजा सुर्वे व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे येथे फिनिक्स जिम्नॅस्टिक ऍकॅडमी मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण आर्य क्रीडा मंडळ संस्कार पब्लीक स्कुल व श्रीरंग विद्यालय या तीन ठिकाणी दिले जाते.