Thursday, June 20 2019 2:58 pm

सीडीआर प्रकरण : नवाजुद्दीनचा भाऊ चौकशीच्या फेऱ्यात

ठाणे : सीडीआर प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने आतापर्यंत तब्बल १५ आरोपीना अटक केली. आहे तर अनेक जण अजूनही पोलिसांच्या रडारवर आहेत. सोमवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अभिनेता  नवाजुद्दीन सिद्धीकी याचा भाऊ शमाज सिद्धीकी याला चौकशीसाठी दुपारी २ वाजता बोलावण्यात आले होते. रात्री पर्यंत त्यांची चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याचे नाव आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या १५ आरोपीनि काढलेल्या सीडीआरच्या ऍनालिसिस केल्यानंतर एक एक नाव पुढे येत आहे. आता ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्धीकी याचा भाऊ शमाज सिद्धीकी याला सोमवारी चौकशीसाठी ठाणे पोलिसांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. पोलीस पथकाने शमाज  याला गुन्हे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या समोर उभे केले. त्रिमुखे यांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट-१ च्या कार्यालयात पाठविले. दुपारपासून त्याची सोमवारी रात्री उशिरापर्यंत  चौकशी पोलीस पथक करीत होते. चौकशीत त्याने काय सांगितले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र आपण पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया शमाज यांनी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.