Saturday, April 20 2019 12:42 am

सीडीआर प्रकरण-दाक्षिणात्य अभिनेत्रींनंतर गुन्हे शाखेकडे मॉडेल रोझलीनही नोंदविणार जबाब

ठाणे : (प्रतिनिधी )बेकायदेशीर सीडीआर  काढल्याप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आतापर्यंत तब्बल १२ आरोपीना अटक केली आहे. यापैकी महिला डिटेक्टिव्ह रजनी  पंडित यांनाच न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. तर बेकायदेशीर सीडीवर प्रकरणात सिने अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी यांच्या नंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल यांच्या तक्रारी गुन्हे शाखेकडे दाखल होत आहेत. सोमवारी दाक्षिणात्य अभिनेत्री आकृती नागपाल हिने आपला सीडीआर  प्रकरणी जबाब नोंदविला. तर मॉडेल रोझलीनने वकील आरोपी रिझवान सिद्धीकी विरोधात गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याकडे तक्ररारीचे निवेदन दिले आहे. दोन दिवसानंतर पुन्हा जबाब नोंदविण्यासाठी येणार असल्याचे रोझलीन खान हिने सांगितले.
सीडीआर  प्रकरणात अटक आरोपीच्या चौकशीत  सीडीआरची मागणी करणाऱ्याच्या यादीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी यांचे वकील रिझवान सिद्धीकी यांची नावे पुढे आली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने वकील रिझवान सिद्धीकी याना अटक केली. त्यानंतर सीडीआर  प्रकरणी सोमवारी  बॉलिवूड अभिनेत्री दीपशिखा नागपाल हिची बहीण दाक्षिणात्य अभिनेत्री आकृती नागपाल हिने जबाब नोंदविल्यानंतर मंगळवारी मॉडेल रोझलीनने ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांची भेट घेतली. त्यांनी आरोपी रिझवान सिद्धीकी याच्या विरोधात तक्रार अर्ज दिला. मात्र मॉडेल   रोझलीनचे प्रकरण सीडीआर प्रकरणा सारखे असल्याने तिने तक्रार अर्ज केला. पोलीस कोठडीत असलेला आरोपी वकील रिझवान सिद्धीकी याच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत असतानाच नव्या तक्रारीही गुन्हे शाखेकडे दाखल होत असल्याने कायद्याची वकिली करून लोकांना सोडविणारा रिझवान सिद्धीकी आता कायद्याच्या कचाट्यात अडकला असून कायद्याचा फास त्याच्या गळ्याभोवती आवळत चालला आहे.आरोपी वकील रिझवान सिद्धीकी बाबत मॉडेल  रोझलीन म्हणाली, आरोपी सिद्धीकी याने त्यांचे संभाषण आणि सीसीटीव्हीचे पुटेज गुन्हे शाखेला देण्याऐवजी ते प्रसारमाध्यमांना दिल्याचा आरोप मॉडेल  रोझलीन हिने केला. वकील रिजवान सिद्धीकी हा बॉलिवूड मधील अनेकांशी संपर्कात आहे. तो प्रसिद्धी मिळवण्यासाठी तो दुसऱ्याच्या प्रतिष्ठेला कलंकित करीत स्वतःची प्रतिमा उजळण्याचा कारोभार करीत असल्याचा आरोपही  केला. तर मॉडेल  रोझलीन बाबतीतही असाच प्रकार केल्याने त्यावेळी तिने बार कौन्सिल कडे तक्रार केली होती, मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याचे रोझलीन हिने सांगितले. आरोपी रिजवान सिद्धीकी हा पैशांसाठी आणि प्रसिद्धीसाठी नेहमीच सेलिब्रिटींच खोट्या प्रकरणात नाव घेत असल्याचा आरोप मॉडेल रोझलीन खान यांनी केला आहे,रोझलीन खान दोन दिवसांनी पुन्हा गुन्हे शाखेकडे येऊन जवाब नोंदविणार असल्याचे सांगितले.