Saturday, April 20 2019 12:36 am

सीडीआर प्रकरणातील आरोपी रिजवानचे बॉलीवूड कनेक्शन

* सिद्धिकी पोलिसांची करतोय दिशाभूल 
* रिजवानवर चीटिंग केस ……कोर्टाचे समन्स आढळले 
* ऋतिक रोशनचा मोबाईल नंबर कंगनाने दिला होता रिजवानला 
* रिजवान २०१४ पासून मेग्नम डिटेक्टिव्हच्या संपर्कात 
* आयशा श्रॉफ ने साहिलचा सीडीआर रिजवानला पाठविला होता 
 
ठाणे : (वार्ताहर )सीडीआर प्रकरणातील ठाणे गुन्हे शाखेने अटक केलेला १२ व आरोपी रिजवान सिद्धीकी हा चौकशीत पोलिसांना खोटी माहिती देत आहे. तपासात अनेक सीडीआर  प्रकरणात रिजवान सहभागी असण्याची शक्यता ठाणे पोलीस वर्तविता आहेत. रितिकचा नंबर कंगना र्नावटणे रिजवानला पाठविला होता. तर रिजवानवर चिटिंगची केस दाखल असून या प्रकरणात जॅकीश्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ हिने साहिल खानचा सीडीवर रिजवानला पाठविला निष्पन्न झाला आहे. या प्रकरणात संबंधित जी नवे  पुढे येतील त्यांना चौकशीसाठी बोलविणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण  विभागाचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. सीडीआर प्रकरणात अटक केलेला नवाजुद्दिन सिद्धिकीचा वकील रिजवान सिद्धिकी याच्या तपासात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. रिजवान सिद्धिकी हा डिटेक्टीव्ह एजन्सी मेग्नम यांच्याशी संपर्कात होता. हे त्याच्या लेपटोपवर सापडलेल्या माहितीवरून निष्पन्न झाले.लेपटोप मध्ये आढळलेल्या टीडीएस संदर्भात एक मेल पोलिसांना तपासणीत आढळला.  रिजवान याच्या लेपटोप मध्ये त्याला वारंगल येथे फसवणुकीची केस दाखल असून त्याला कोर्टाने पाठविलेल्या समन्स हे आढळले. दरम्यान २०१६ साली सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिने ऋतिक रोशनचा एक मोबाईल नंबर रिजवान सिधीकीला पाठविला होता. तो कशासाठी याचा खुलासा तपासात होणार असल्याचे त्रिमुखे यांनी सांगितले. रिजवान याचे सीडीआर बॉलीवूड कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याच्या चौकशीत तो पोलिसांची दिशाभूल करून सीडीआर प्रकरणात अटक करण्यात आलेला मेग्नम डिटेक्टीव्ह एजन्सीचा प्रशांत पालेकर याला सहा महिन्यापासून ओळखत असल्याचा खुलासा रिजवान करीत आहे. दुसरीकडे रिजवान याला जेकी श्रॉफ याची पत्नीने सीडीआर पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आयशा श्रॉफ आणि साहिल खान यांच्या व्यापाराच्या भांडणातून आयशा श्रॉफ हिने साहिल खान याचा सीडीआर अन्यत्र काढून तो रिजवानला  पाठविला होता. या सीडीआर प्रकरणात रोज नवा धक्कादायक खुलास होत असतानाच त्यात बॉलीवूड कनेक्शन असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणात ज्यांच्या नावाचा उल्लेख आढळला आहे. त्या सर्वाना समन्स पाठवून चौकशी करणार असल्याची माहिती गुन्हे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.