Friday, May 24 2019 8:44 am

सीएसएमटी स्टेशनजवळचा पादचारी पूल कोसळून ५ जणांचा मृत्यु

मुंबई: – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) रेल्वेस्थानकाबाहेरील पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सांयकाळी ७.३० वाजता कोसळला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण गंभीर जखमी झालेल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. जखमी मध्ये
३  महिलांचा देखील समावेश आहे. अपूर्वा प्रभु ,रंजना तांबे, जाहिदा खान ,भक्ती शिंदे आणि तपेंद्र सिंह   अशी मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत. हा पुल काम रुग्णालयाच्या गल्लीकडे तसेच किला कोर्टाकडे जाणाऱ्या मार्गाकडे जोडला जातो. या पुलावर असलेलं क्राँक्रिट पूर्णपणे पडलं असून आता केवळ पुलाचा सांगाडा उरला आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या चार गाड्या आणि दोन रुग्णवाहिका पोहोचल्या असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणारा या पूलाचा ६०℅ भाग कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

या घटनेत ३४ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना सेंट जॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात जखमींना हलवलं आहे. दरम्यान पुलाचा भाग रस्त्यावर कोसळून त्याखाली लोक अडकले असलेल्या मुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटनास्थळी  सध्या अग्निशमन दलातर्फे मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. अग्निशमन दल आणि पोलीस यांचा समावेश आहे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारीही या ठिकाणी आहेत आणि बचावकार्य राबवत आहेत.
घटनास्थळी काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली असुन एकमेकांवर आरोप प्रत्यारो करत आहेत. हा पुल रेल्वे प्रशासनाने बांधला असून या पुलाची जवाबदारी सरकारची होती की रेल्वे प्रशासनाची होती असा प्रश्न निर्माण झाला आहे.