ठाणे, २३ – हिंदु संस्कृतीमधील स्त्रियांचा सर्वात आवडता सण म्हणजे हळदी कुंकू जुनी नाती दृढ करायची व नवी नाती निर्माण करायची या व्यापक हेतूने हळदी कुंकवाच सौभाग्य लेणं लुटण्याकरीता दरवर्षीप्रमाणे गोदुताई परुळेकर मैदान, सिद्धेश्वर तलाव परिसरात चैत्र गौरी महिला मंडळाच्या वतीने मकर संक्रांती निमित्त *’हळदी कुंकू समारंभ’ व ‘उधळू रंग स्वराचे’* या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या हळदी कुंकू कार्यक्रमाच्या सोहळ्याला *सौ. रश्मीताई ठाकरे* यांनी प्रमूख उपस्थित लावली.. भूतो न भविष्यती असा महिलांचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला. या कार्यक्रम सोहळ्याला सौ. रश्मीताई ठाकरे यांचे स्वागत घोडबंदर परिसरातील आदिवासी बांधवांनी आदिवासी नृत्य सादर करून केले.
तसेच विभागातील ज्येष्ठ व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात भव्य लकी ड्रॉ, प्रश्न मंजुषा तसेच उत्तेजनार्थ पारितोषिके देखील देण्यात आले. मा. नगरसेविका नंदिनी विचारे यांनी उपस्थित महिलांना निष्ठावंतांचा पाठींबा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच आहे असे दाखवून देण्यासाठी महिलांना आपल्या मोबाईल मधील टोर्च (लाईट) सुरु करण्यास सांगितल्यावर महिलांनी मोबाईल टोर्च सुरु करून उस्पुर्त प्रतिसाद देऊन घोषणा दिल्या.
यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवीमुंबई महिला जिल्हा अध्यक्ष रंजना शिंत्रे, मीरा भाईंदर गटनेत्या नीलम ढवण, महिला जिल्हा संघटक सौ. समिधा सुरेश मोहिते, श्रीमती. रेखा मोहन खोपकर, महीला उप जिल्हा संघटक सौ. महेश्वरी संजय तरे, अँड. आकांक्षा आत्माराम राणे, श्रीमती. संपदा पांचाळ, महिला शहर संघटक सौ. स्मिता सुभाष इंदुलकर, सौ. वासंती पंढरी राउत, सौ. प्रमिला भांगे, महिला उपशहर संघटक सौ. मंजिरी विलास धमाले, श्रीमती. कुंदा दळवी, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सौ. शितल हुंडारे मिंढे, महिला विभाग संघटक सौ. संपदा उरणकर, सौ. नंदा महेश कोथाळे, महिला उपविभाग संघटक श्रीमती. राजेश्री नवीन सुर्वे, मा. नगरसेविका सौ. रागिणी बैरिशेट्टी, सौ. अंकिता विजय पाटिल, मा. नगरसेवक मंदार विचारे, युवतीसेना सहसचिव धनश्री राजन विचारे, युवा सेना अधिकारी किरण जाधव, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख वसंत गवाळे, दीपक साळवी, आदी मान्यवर व स्थानिक विभाग प्रमुख जिवाजी कदम, शाखाप्रमुख मधु जांभरकर प्रभागातील नव्याने नियुक्त झालेले पदाधिकारी, युवासेना, युवतीसेना, व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.