Saturday, July 11 2020 11:02 am

सिद्धिविनायक मंदिर पुढील पाच दिवस राहणार बंद

मुंबई :माघी गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी अशा प्रकारचं शेंदूर लेपण श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला केलं जात असतं. त्यादरम्यान गाभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येते. सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त येत असतात. संकष्टी, अंगारकीच्या दिवशी तर ही संख्या लाखांच्या घरात जाते. या सर्व गणेशभक्तांना सगुण, साकार, प्रसन्न सिद्धिविनायकाचं दर्शन व्हावं यासाठी मंदिर ट्रस्ट सतत प्रयत्नशील असतो.गणपतीबाप्पाला गा-हाणं घालण्यासाठी किंवा एखादा नवस फेडण्यासाठी प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाला यायचं असेल, तर १५ जानेवारी ते १९ जानेवारीदरम्यान येऊ नका. कारण, या पाच दिवसांत गणरायाच्या मूर्तीला ‘शेंदूर लेपन’ करण्यात येणार असल्यानं सिद्धिविनायक मंदिराचा मुख्य गाभारा बंद राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत भाविकांना बाप्पाचं दर्शन घेता येणार नाही.

सिद्धिविनायक मंदिराचा मुख्य गाभारा १५ ते १९ जानेवारीदरम्यान बंद राहणार असला तरी ‘श्रीं’च्या प्रतिमूर्तीचे दर्शन भक्तांना घेता येईल. त्यानंतर, २० जानेवारीला मूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर भाविकांना प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येईल, अशी माहिती न्यासातर्फे देण्यात आली आहे.