Sunday, September 15 2019 11:05 am

सासूबाईंच्या मृत्यूनंतर सूनेने आनंद व्यक्त केल्याने पतीकडून सुनेची हत्त्या ..

कोल्हापूर : कोल्हापुरातील आपटेनगर परिसरात राहणाऱ्या मालती लोखंडे यांचं शनिवारी पहाटे निधन झालं. यांची सून शुभांगी लोखंडे यांना  सासूच्या निधनाचा आनंद व्यक्त केला. , यामुळे चिडलेल्या मुलाने पत्नीची हत्या केली आणि तिने दुःखातून आत्महत्या केल्याचा बनाव रचला, असा प्रकार कोल्हापुरात गेल्या शनिवारी  उघडकीस आला आहे. आईच्या निधनावर सुनेने आनंद व्यक्त केल्यामुळे मुलाने पत्नीला इमारतीवरुन ढकलून दिले.येवड्या ने तिचा जीव गेला नाही म्हणून त्याने तिच्या डोक्‍यात फरशी घातली. अशी  आरोपी पती संदीप लोखंडे याने पोलिसांसमोर कबुली दिल्याची माहिती आहे. पोलिसांनी संदीपला अटक केली असून वडील मधुकर लोखंडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.या निधनाच्या धक्‍क्‍याने सून शुभांगी लोखंडे अस्वस्थ झाल्या. देवघरातून त्यांनी अंगारा आणला. अंगारा सासूबाईंना लावूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शुभांगी यांनी
दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्याकेली, असा बनाव पती संदीप लोखंडेने केला होता.
तपासादरम्यान नोंदवलेल्या जबाबात पोलिसांची शंका बळावली. ही आत्महत्या नसून घातपाताचा प्रकार असल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला.
लोखंडेंचा दुसरा मुलगा शिवतेज दहावीच्या परीक्षेसाठी शाळेत आला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आईच्या निधनानंतर शुभांगी यांनी व्यक्त केलेले चेहऱ्यावरील हावभाव पाहून संदीप संतप्त झाला. ती केर काढत असताना त्याने पत्नीला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उचलून फेकून दिल्याचं शिवतेजने चौकशीत सांगितलं.
शुभांगी गंभीर जखमी झाल्यामुळे संदीप खाली गेला आणि त्याने शुभांगी यांच्या डोक्‍यात फरशी घातली, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. शुभांगी यांनी आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची कबुली संदीपने पोलिसांसमोर दिली.