Friday, December 13 2024 12:19 pm

सारथी, बार्टीसह महाज्योतीच्या सर्व योजनांमध्ये सुसूत्रता आणणार – मंत्री अतुल सावे

मुंबई,03 : ‘सारथी’ ‘बार्टी’ तसेच ‘महाज्योती’च्या सर्व योजनांमध्ये लवकरच सुसूत्रता आणणार आहोत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत दिली.

‘महाज्योती’ संस्थेने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, महाज्योती संस्थेमार्फत सन २०२२-२३ मध्ये एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणाकरिता ४,९६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४,२११ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होते. सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करून ६,५०० करण्यात आली आहे, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.